Home अहमदनगर अहमदनगर: पैशाच्या वादातून मित्राचा खून, तरुणाला गाडीतून फेकले

अहमदनगर: पैशाच्या वादातून मित्राचा खून, तरुणाला गाडीतून फेकले

Ahmednagar Murder Case: चौघा आरोपींनी पिकअपच्या मागील भागातून तरुणास  बाहेर काढून टाकत तिथून पलायन.

Murder of a friend due to a money dispute

श्रीगोंदा: पैशाच्या वादातून तुषार अण्णासाहेब दरेकर (रा. हिरडगाव) या तरुणाचा चौघांनी खून केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी अण्णा भाऊसाहेब ससाणे, परशुराम दादा गुणवरे, शिवाजी भास्कर दरेकर, सतीश रामदास दरेकर (सर्व रा. हिरडगाव) यांना अटक केली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी राहुल दरेकर यांनी फिर्याद दिली आहे.

मयत तुषार हा आरोपी अण्णा ससाणे यांच्यासोबत पोल उभारणीच्या कामासाठी गेला होता. ९ डिसेंबर रोजी तो सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडला. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास तुषार यास जेवणाकरिता फोन केला. कोठे आहे, घरी यायला किती वेळ आहे, असे विचारले असता, त्याने सांगितले की, आम्ही श्रीगोंदा येथील वैष्णवी हॉटेलमध्ये जेवणाकरिता थांबलो आहे. थोड्या वेळात घरी येतो. त्यानंतर साधारण रात्री ९ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान आई आशाबाई हिला घराचे बाजूला एक पिकअप गाडी आल्याचे दिसले. ही पिकअप गाडी ठेकेदार अण्णा ससाणे यांची असल्याने आशाबाई यांनी पुढे जाऊन पाहिले असता, वरील चौघा आरोपींनी पिकअपच्या मागील भागातून तुषार यास बाहेर काढून टाकत तिथून पलायन केले.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

आई आशाबाई यांना तुषार हा खाली जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला होता. मृतदेहाचे पुणे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात मयत तुषार याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

Web Title: Murder of a friend due to a money dispute

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here