मराठा आरक्षणावर वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात
नागपूर: मराठा आरक्षणावरून विनाकारण राजकारण करू नये. अशोक चव्हाण चांगले काम करीत आहे. मराठा आरक्षणावर चर्चा बैठका चालू आहेत. देशातले नामांकित वकील यासाठी उभे केले आहेत. विनायक मेटे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, निराधार आहेत. मराठा प्रश्नावर वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्याकडे लक्ष न दिलेलेच बरे असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण गंभीर नाहीत. राज्यसरकार मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडत नाही. अशोक चव्हाण यांना उपसमिती वरून हटविण्यात यावे. आम्ही ४ ते ७ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करणार आहोत असे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले. त्यावर त्यावर बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Attempt to pollute the environment on Maratha reservation