Home संगमनेर संगमनेर तालुक्यात करोना वाढताच, आज आणखी ८ रुग्ण वाढले

संगमनेर तालुक्यात करोना वाढताच, आज आणखी ८ रुग्ण वाढले

Sangamner taluka 13 coronaviruses infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. जरी रुग्ण वाढत असले तरी त्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संगमनेर तालुक्यात आज सकाळी पाच खासगी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा रॅपिड अॅटीजेन टेस्ट मार्फत आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ८१६ वर पोहोचली आहे.

संगमनेर शहरातील नेहरू चौक येथे ५२ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ६९ व ४२ वर्षीय व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. इंदिरानगर येथे ६० व ३५ वर्षीय महिला, ताजणे मळा ३६ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात आज पाच रुग्णांची भर

तालुक्यातील गुंजाळवाडी येथील २० वर्षीय तरुणी, कनोली येथील ५ वर्षीय बालिकेला करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात तेरा रुग्ण आढळून आले आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka 13 coronaviruses infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here