Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात आज पाच रुग्णांची भर

Sangamner: संगमनेर तालुक्यात आज पाच रुग्णांची भर

Sangamner taluka five coronavirus infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज सोमवारी आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे. काल रविवारी २४ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे आज तालुक्यात रुग्णांची संख्या ८०८ इतकी झाली आहे.

आज सकाळी खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील अभिनवनगरमध्ये ६७ वर्षीय पुरुषाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. घुलेवाडी येथील ५१ व ५२ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. कनोली येथे ६५ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह मिळून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील आजची संख्या पाच झाली आहे. संगमनेर तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या ८०८ वर पोहोचली आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka five coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here