खासदार नवनीत राणा यांच्या घरात करोनाची एन्ट्री
अमरावती: खा. नवनीत राणा यांच्या घरात करोनाने एन्ट्री केली आहे. नवनीत राणा यांच्या सासू सासरे यांना करोनाची लागण झाली आहे. रवी राणा यांच्या आई वडिलांबरोबरच कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे.
नवनीत राणा यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने रवी राणा आणि नवनीत राणा यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रवी राणा यांच्या आई वडिलांना करोनाची लक्षणे दिसत होती. त्यांनी करोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रवी राणा व नवनीत राणा यांनी देखील करोनाची चाचणी केली असता त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Navneet Rana Family 7 people corona positive