Home महाराष्ट्र अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज तर अमित शहा रुग्णालयात

अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज तर अमित शहा रुग्णालयात

Amitabh Bacchan Corona Free and Amit shah corona positive

मुंबई:  बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे रविवारी बरे होऊन घरी परतले आहेत तर अमित शहा यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्वीट करून नमूद केले आहे.

अमित शहा यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी करोनाची चाचणी करून घेतली तर त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने करोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन यांना १५ दिवसांपूर्वी करोना झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अजून उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातील कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्यामुळेच आपण बरे झालो आहोत असे त्यांनी व्यक्त केले.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Amitabh Bacchan Corona Free and Amit shah corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here