Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचा चार चाकीतून अपहरणाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचा चार चाकीतून अपहरणाचा प्रयत्न

Ahmednagar abduction: 

Attempted abduction of a minor girl from a four-wheeler

अहमदनगर: अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा चारचाकीतून अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उपनगरातील एका शाळेत गुरूवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, अपहरण, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित अंकुश पवार (वय 30 रा. आष्टी, जि. बीड), अमोल प्रदीप गिरी (वय 28 रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड), आकाश अंबर पुरी (वय 27 रा. डॉन बास्को कॉलनी, कॉटेज कॉर्नर, सावेडी), अंकुश अंबादास पवार व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन मुलगी उपनगरातील एका शाळेत शिक्षण घेते. ती नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी शाळेत गेली होती. सायंकाळी शाळेच्या गेटवर एक चारचाकी कार आली. त्यातील दोघांनी मुलीला कारमध्ये ओढले.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

मुलीने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. घडलेला प्रकार शिक्षकाला व नंतर आई-वडिलांना सांगितला. दरम्यान पीडित मुलगी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी गेली. घरून दूध आणण्यासाठी बाहेर पडताच पुन्हा कारमधून आलेल्या व्यक्तींनी तिचा अपहरणाचा प्रयत्न केला. त्यावेळी काही स्थानिक नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. दोघे पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Attempted abduction of a minor girl from a four-wheeler

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here