राजूर: लम्पीमुळे यावर्षीचे डांगी जनावरांचे प्रदर्शन रद्द
Rajur News | Dangi animal exhibition : डांगी जनावरांचे प्रदर्शन लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे. तसे पत्र तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजूर ग्रामपंचायतीला दिले.
राजुर: राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे. तसे पत्र तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजूर ग्रामपंचायतीला दिले आहे.
अकोले तालुक्यात राजूर येथे राज्यातील सर्वांत मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. राज्यातील व राज्याबाहेरील जनावरे येथे विक्रीसाठी आणली जातात. कोरोनामुळे मागील दोन वर्षे प्रदर्शन भरले नाही. आता जनावरांना लम्पी संसर्ग होऊ नये. यासाठी प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे यांनी राजूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रदर्शन आयोजन करू नये, असे सूचित केले आहे. त्यामुळे शेतकरी, दुकानदार नाराज झाले आहेत.
तालुक्यातील २३०० जनावरांना लम्पी आजार झाला असून, त्यात ४५० गंभीर आहेत. शंभर टक्के लसीकरण झाले असून, १७० जनावरे दगावली आहेत. त्यामुळे राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविणे योग्य ठरणार नाही. प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तसे लेखी पत्र राजूर ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे म्हणाले.
Web Title: Rajur Dangi animal exhibition is canceled due to Lumpy
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App