Home क्राईम धक्कादायक प्रकार! औषधाच्या गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

धक्कादायक प्रकार! औषधाच्या गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

Pune Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न.

Attempted murder of wife by swallowing blade from medicine pill

पुणे: पुण्यातील उत्तम नगर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून औषधी गोळीतून पत्नीला ब्लेड खाऊ घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न उघकडीस आला आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , सोमनाथ पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे तो तिच्याशी कायम वाद घालून तिला मारहाण करून तिचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी दारू प्यायला होता. यावरून छायाने सोमनाथला जाब विचारला. तसेच त्याला घरी दारू प्यायला बोलावू नका, असे ठणकावून सांगितले. या कारणावरून सोमनाथ चिडला होता. त्याने छायाशी यावरून वाद देखील घातला.

सततच्या त्रासाला कंटाळल्याने त्याने पत्नी छायाला जीवे मारण्याचा कट रचला. त्याने ओैषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया हिला खायला दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Attempted murder of wife by swallowing blade from medicine pill

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here