Accident: आयशर टेम्पोची मोटारसायकलला धडक, दोन ठार
राहुरी | Accident: राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने तालुक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात दि. 23 सप्टेंबर रोजी २:१५ वाजेच्या दरम्यान घडला. या अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले.
या अपघातात विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे
राहुरी तालुक्यातील दोन तरूण स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच 17 एन 7891 हिच्यावर बसून नगर-मनमाड रस्त्याने राहुरीकडून राहुरी खुर्दकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने मुळा नदीवरील पुलाजवळ असलेल्या बगीचा जवळ दुपारी सव्वादोन वाजे सुमारास मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. तसेच मोटारसायकलवरील दोन तरूण जागीच ठार झाले.
सदर ठिकाणी एका महिलेने मिठाईचे दुकान लावले होते. धडक झाल्यावर मिठाई रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. तर महिला बालंबाल बचावली. अपघातानंतर आयशर टेम्पो पसार झाला होता. मात्र, राहुरी खुर्द येथील गणेश भांड व रवी आभाळे या दोन तरूणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आयशर टेम्पोचा मोटारसायकलवर पाठलाग करत नांदगाव परिसरात त्या टेम्पोला पकडून टेम्पोचालकाला घटनास्थळी आणण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Ayashar Tempo and motorcycle Accident two Death