Home Accident News संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना: चिमुकलीला अतिविषारी सापाचा दंश, जीव वाचला पण

संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना: चिमुकलीला अतिविषारी सापाचा दंश, जीव वाचला पण

Sangamner Accident enomous snake bite on Chimukali

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील माळवाडी येथील आदिवासी गरीब कुटुंबातील पूजा खंडागळे या चिमुकलीला अतिविषारी सर्पाने दंश केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला डॉक्टरांनी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे. मात्र तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सध्या तिला मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन माळवाडी गावाचे पोलीस पाटील संजय जठार यांनी केले आहे.

माळवाडी परिसरात चिमाजी खडांगळे हे आदिवासी कुटुंब राहत आहे. चिमाजी व पत्नी हे दाम्पत्य मोलमजुरी करत असून त्यांना तीन मुलं आहेत. यामधील पूजा ११ वर्षाची आहे. मंगळवारी दिवसभर कबाड कष्ट करून संध्याकाळचे जेवण करून हे कुटुंब झोपले होते. परंतु ते राहत असलेल्या छपराच्या कुडातून रात्रीच्या वेळेस अतिविषारी साप घरात आला व झोपेत असलेल्या पूजाच्या हाताला दंश केला व तिला त्रास जाणवू लागल्याने कुटुंब जागे झाले. त्यांनी आजूबाजूला पहिले असता साप आढळून आला. पुजाला जास्त त्रास सुरु झाल्याने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील प्रसिद्ध असलेले विषबाधा व सर्पदंश डॉ. सदानंद राउत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुजावर माणुसकीची भावना दाखवत पुजावर मोफत उपचार करत तिला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे. मात्र मेडिकल व इतर खर्च जास्त असल्याने अजूनही मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस पाटील संजय जठार यांनी केले. विशाल बाळासाहेब मुसळे मो. ९६८९५३८३३३ यांच्याशी संपर्क करावा.

Web Title: Sangamner Accident enomous snake bite on Chimukali

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here