आयुषीने जिल्ह्यातील या तालुक्यातील झेंडा अटकेपार फडकाविला, मिळविला फायटर पायलट होण्याचा मान
पाथर्डी: आयुषी नितीन खेडकर हिने जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे आयुषीने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकाविला आहे. देश्भरामधून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश आहे. यामध्ये ११ मुलीचा समावेश आहे.
डॉ. नितीन व डॉ, मनीषा खेडकर यांची ही मुलगी आहे. बेंगलोर येथील एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. .तिने ऑगस्ट २०२० फायटर पायलटची परीक्षा दिली. तो निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. बी टेक करण्यासाठी ती चैन्नई येथे गेली होती. तिने गुवाहाटी येथील राष्ट्रीय तयाकान्दो स्पर्धत कास्य पदक पटकाविले होते. तिची एकाचा वेळेस नौसेना व वायू सेनेत निवड झाली. येणाऱ्या १ सप्टेंबरपासून हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.
Web Title: Ayushi khedkar fighter pilot