राहुरी | Rahuri: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
प्रेम पांडुरंग चव्हाण वय ३७ या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. आरोपी हा बेकायदेशीर गावठी कट्ट्याची विक्री करत असल्याच्या उद्देशाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर आणि संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी श्रीरामपूर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.
Web Title: Rahuri Accused arrested