Home अहमदनगर अहमदनगर: बलात्काराच्या गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा जामीन रद्द

अहमदनगर: बलात्काराच्या गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा जामीन रद्द

Ahmednagar Rape Case: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा याचा तात्पुरता मंजूर झालेला जामीन जिल्हा न्यायालयाने रद्द केला आहे.

Bail of police sub-inspector in rape case canceled

राहुरी : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक सज्जन याचा तात्पुरता जामीन जिल्हा न्यायालयाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

राहुरी तालुक्यातील एका गरीब महिलेवर आरोपी पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा याने दि. १७ जुलै २०२३ रोजी बलात्कार केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी नान्हेडा याला अटक करण्यासाठी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले होते.

दरम्यान, आरोपीच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. तेव्हा जिल्हा न्यायालयाने आरोपी सज्जन नान्हेडा याचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्या जामीन अर्जावर १२ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीश माधुरी अनुप बरालीया यांच्या समोर सुनावणी झाली. पीडित महिलेच्या वतीने अॅड. स्नेहल लोखंडे व अॅड. अनिल डोखे यांनी काम पाहिले.

Web Title: Bail of police sub-inspector in rape case canceled

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here