Home अहमदनगर अहमदनगर: मुले शाळेतून घरी आले असता वडिलांचे धक्कादायक कृत्य

अहमदनगर: मुले शाळेतून घरी आले असता वडिलांचे धक्कादायक कृत्य

Ahmednagar News: एका विवाहित तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

young man committed suicide by hanging himself with the help of a rope

राहुरी : तालुक्यातील टाकळीमिया येथे एका विवाहित तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि. १४ रोजी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली.

मयत तरुण सय्या उस्मान दरवेशी (वय ३५, रा. टाकळीमिया) हा त्याच्या घरात एकटाच असताना त्याने घराच्या दाराला आतून कडी लावून गळफास घेतला. मुले दुपारी शाळेतून घरी आल्यावर त्यांनी दार वाजवले असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिसरातील लोकांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता सय्या दरवेशी हा फॅनला दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. परिसरातील तरुणांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी विशाल आंबरे यांनी त्याला मयत घोषित केले. सय्या याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Young man committed suicide by hanging himself with the help of a rope

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here