Home अहमदनगर बाळ बोठे पोलिसांसमोर खडा खडा बोलत नाही तर गोल गोल फिरवतोय  

बाळ बोठे पोलिसांसमोर खडा खडा बोलत नाही तर गोल गोल फिरवतोय  

Bal Bothe is not talking in front of the police, but is spinning 

अहमदनगर: रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे ( Bal Bothe) स्वतः चा आयफोन घरात ठेऊन तब्बल साडे तीन महिने पसार होता. यावेळी त्याने रिक्षाचालक, एस.टी. चालक तर गुंडांचा मोबाईल वापरत पोलिसांना गुंगारा दिला.

त्याने अजूनही खरी माहिती पोलिसांना सांगितली नाही. त्यामुळे पोलीस त्याच्यापुढे हतबल झाले असल्याचे सध्याचे चित्र दिसून येत आहे. त्याला हैदराबाद येथून अटक केली. अटकेचा मोठा गवगवा केला.पारनेर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नगरला आणले. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. तरीदेखील बाळ बोठे अजून खडा खडा बोलत नाही. या हत्याकांडात आणखी काही लोकांचा समावेश असेल यामुळे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. आणखी चौकशी करणे बाकी आहे असे सांगत न्यायालयास सांगत आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढविली.  तरी देखील अद्याप बाळ बोठेनी पोलिसांना खरी माहिती दिलेली नाही. याउलट तोच पोलिसांना गोल गोल फिरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बोठेच्या आयफोनचा लोकं अजूनही उघडला नाही. बाळ बोठेने जाणीवपूर्वक घरी ठेवलेला आयफोन पोलसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी आयफोनबाबत पासवर्ड विचारला असता पासवर्ड आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे तपासात पास झालेले पोलीस चौकशीत मात्र अपयशी असल्याचे चित्र समोर येत आहे.   

Web Title: Bal Bothe is not talking in front of the police, but is spinning 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here