Home अहमदनगर Bal Bothe: बाळ बोठे खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग

Bal Bothe: बाळ बोठे खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग

Bal Bothe on the offense of ransom

अहमदनगर | Bal Bothe: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी असलेला बाळ बोठे याला आज नगरच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे. त्यामुळे बाळ बोठेला तिसऱ्या गुन्ह्यात घेण्यात आले आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी हैद्राबाद येथून नगरला बोठे याला आणले होते. जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यांनतर कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात बोठेला दोन दिवसांपूर्वी वर्ग करण्यात आले होते. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर आता तोफखाना पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे. महिलेला १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी बोठे आणि एका डॉक्टरविरुद्ध खंडणीचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

Web Title: Bal Bothe on the offense of ransom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here