Home अकोले अकोले: फेसबुकवर अक्षेपार्हे मजकूर टाकू नका असे सांगितल्याच्या रागातून सेवा केंद्रचालकास मारहाण

अकोले: फेसबुकवर अक्षेपार्हे मजकूर टाकू नका असे सांगितल्याच्या रागातून सेवा केंद्रचालकास मारहाण

Beating the service center manager out of anger crime register

अकोले | Crime: अकोले तालुक्यातील कोतूळ येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा सेवा केंद्रचालक धनंजय सुभाष बोऱ्हाडे वय ३२ यांना कोतूळ येथील काही आरोपींनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा सेवा केंद्रचालक धनंजय सुभाष बोऱ्हाडे यांच्याबद्दल शिक्षक प्रशांत भाऊसाहेब गीते यांनी फेसबुकवर मजकूर व्हायरल केला पण तो अक्षेपार्हे असल्याने फिर्यादी धनंजय बोऱ्हाडे यांनी गीते यांना असे करू नका असे समजावून सांगितल्यावर त्याचा मनात राग धरून कोतूळ येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक प्रशांत गीते, सचिन भाऊसाहेब गीते, अक्षय लहानू खरात, मोहन सखाराम खरात, गणेश भिका खरात या पाच जणांनी भुजबळ हॉस्पिटलच्या बोळात अडवून जबरी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत धनंजय सुभाष बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत गीते, सचिन भाऊसाहेब गीते, अक्षय लहानू खरात, मोहन सखाराम खरात, गणेश भिका खरात या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Beating the service center manager out of anger crime register

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here