Home क्राईम माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने...

माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने जीवन संपविले

Beed Crime: मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Beed girl Suicide 13 year old girl ends life incident in Beed

बीड: बीडमध्ये एक धक्कादायक घटना घटना समोर आली आहे. मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटदेखील  लिहिली आहे.

मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले… असे दिक्षाने आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. मृत दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने तिचे मामा तिचा सांभाळ करत होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्वजण शेतात काम करत होते. यादरम्यान घरी कोणी नसताना दिक्षाने 6 वाजेच्या सुमारास ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात  आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Beed girl Suicide 13 year old girl ends life incident in Beed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here