Home क्राईम धक्कादायक! पाठलाग करीत तरुणावर दोनदा गोळीबार, सहा जणांवर गुन्हा

धक्कादायक! पाठलाग करीत तरुणावर दोनदा गोळीबार, सहा जणांवर गुन्हा

Pune Crime: जुन्या भांडणाच्या कारणावरून जमाव जमवून सहा जणांनी तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर दोनदा गोळीबार (Firing) केल्याची घटना. सहा जणांवर गुन्हा दाखल.

Youth shot twice Firing while chasing, incident in varale village Pune

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून जमाव जमवून सहा जणांनी तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर दोनदा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्याच्या कारची तोडफोड करत दहशहत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. ३०) वराळे गावच्या हद्दीतील समता कॉलनी येथे घडली. या प्रकरणी उदय अशोक लांडे (वय २३, रा. समताकॉलनी) यांनी शनिवारी (दि. ३१) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.

अनिल जगन जाधव (वय २३), संजय ज्ञानेश्वर माळवदकर (वय २४), कुमार सुरेश मोहीते (तिघे रा. तळेगाव दाभाडे), हर्ष उर्फ सोन्या प्रमोद साठे (वय १९, रा. वडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. तर, गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची बापू रीठे (रा. वडगाव मावळ), रोहन उर्फ चिक्या शिंदे (तळेगाव) दाभाडे) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामधील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी हातात पिस्तुल व कोयत्या अशी हत्यार घेत फिर्यादीचा पाठलाग केला. आरोपीला जीवे मारण्यासाठी आरोपींनी दोनदा पिस्तूल मधून फायर केले. मात्र, फिर्यादी लांब असल्याने त्याला गोळ्या लागल्या नाहीत. तो पळत जाऊन घरात लपवला असता आरोपींनी घराच्या बाहेर लावलेल्या फिर्यादीच्या कारची तोडफोड करत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Youth shot twice Firing while chasing, incident in varale village Pune

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here