Home क्राईम संगमनेरात १ लाख ८७ हजार ५०० रूपयांचे गोमांस पकडले, पोलिसांचा छापा

संगमनेरात १ लाख ८७ हजार ५०० रूपयांचे गोमांस पकडले, पोलिसांचा छापा

Sangamner Crime: संगमनेर शहर पोलिसांचा भारतनगर येथे छापा (Raid) टाकत ७५० किलो गोमांस जप्त केल्याची कारवाई.

Beef worth Rs 1 lakh 87 thousand 500 seized in Sangamner, police raid

संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी भारतनगर येथे छापा टाकत १ लाख ८७ हजार ५०० रूपयांचे ७५० किलो गोमांस पकडले आहे. ही कारवाई गुरुवार( ता.१५) जून रोजी रात्री पावने दहा वाजेच्या सुमारास केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील शहरातील भारतनगर येथील सरवर हाजी याच्याकडे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकत ७५० किलो गोमांस जप्त केले आहे.

यावेळी सरवर हाजी हा पोलिसांना पाहून पळून गेला आहे. याप्रकरणी पोलिस काॅन्सटेबल कानिफनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सरवर हाजी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक धिंदळे हे करत आहे.

Web Title: Beef worth Rs 1 lakh 87 thousand 500 seized in Sangamner, police raid

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here