Home क्राईम १५ वर्षांची लेक गरोदर राहिली, नराधमाचे नाव ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली

१५ वर्षांची लेक गरोदर राहिली, नराधमाचे नाव ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली

Nagpur Crime: एका ५२ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना

15-year-old Lake became pregnant Nagpur Rape Case

नागपूर: नागपूरमध्ये एका ५२ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. काही दिवसांनी ही मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.  पोटात दुखू लागल्याने विद्यार्थिनीच्या आईने तिला रुग्णालयात नेले. मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगी कोणातरी मुलाचा प्रेमात असल्याचा आईला संशय होता. मात्र, शेजारी राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीमुळे ती गरोदर झाल्याचे समोर आल्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली . महिलेने आपल्या गर्भवती मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संजय आत्माराम तायडे (५२) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १५ वर्षीय पीडिता तिच्या आईसोबत राहते. आई खासगी नोकरी करते. त्यामुळे मुलगी घरात एकटीच असते. शेजारी राहणाऱ्या संजय तायडे याची मुलीवर वाईट नजर होती. तो विनाकारण मुलीच्या घरी यायचा आणि चहा – पाणी घेऊन जायचा. तो अनेकदा मुलीला बिस्किटे आणि चॉकलेट देऊन गोळी घालत असे. संजय एका कंपनीत काम करतो. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत.

वडिलांसारखा शेजारी घरात येत-जात असल्यामुळे मुलीच्या आईला त्याच्या वागण्याचा संशय आला नाही. १७ जानेवारीला मुलगी घरी कपडे बदलत होती. त्यावेळी संजय त्यांच्या घरी आला होता. त्याने मुलीला जवळ ओढले आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मुलगी रडायला लागली. मात्र, त्याने तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरुन गप्प राहिली. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने आईला सांगितले. आई तिला घेऊन डॉक्टरकडे गेली असता मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. संजय तायडे याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने आईला सांगितले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: 15-year-old Lake became pregnant Nagpur Rape Case

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here