Home Accident News संगमनेर: कारचा भीषण अपघात, विजेचा पोल कारमध्ये घुसला, तरुणाचा मृत्यू

संगमनेर: कारचा भीषण अपघात, विजेचा पोल कारमध्ये घुसला, तरुणाचा मृत्यू

Sangamner: भरधाव येणाऱ्या कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघाताची (Accident) घटना घडली यामध्ये कार चालक युवकाचा जागीच मृत्यू.

car accident, electric pole enters the car, youth dies

संगमनेर: भरधाव येणाऱ्या कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघाताची घटना घडली यामध्ये कार चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारचाही चुरडा झाला. हा अपघात काल गुरूवारी रात्री १० च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाट्याजवळ घडला.

मोहन बबन अभंग (वय २३ रा. देवाचा मळा) असे या अपघातात ठार जालेल्या युवकाचे नाव आहे. या बाबत माहिती अशी की, मयत महेश अभंग हा रात्री जेवन केल्यानंतर एक काम आहे असे सांगून घरातून स्वीफ्ट डिझायर क्र. एमएच ४३ एएल ०९९७ घेऊन गेला. नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जात असतांना खांडगाव फाट्याजवळ त्याचा आपल्या वाहानावरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्यामधील दुभाजकावर जावून जोरात आदळली. यावेळी गाडीचा वेग इतका होता की, रस्त्यामधील वीजेचा खांब थेट या कारमध्ये घुसला. यात महेश यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबची माहिती शहरात समजताच अनेक तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महेश अभंग यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. आई-वडिल, पत्नी, मुलगा असा परिवार त्यांच्या पश्चात आहे. या अपघाताबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहे.

Web Title: car accident, electric pole enters the car, youth dies

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here