Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराज यांना दिलासा
Indurikar Maharaj: आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी खंडपीठाने ४ आठवड्यांची मुभा.
छत्रपती संभाजीनगर: प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला ‘प्रोसेस इश्यू’चा (समन्स बजावण्याचा) आदेश खंडपीठाचे न्या. किशोर संत यांनी शुक्रवारी कायम केला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ‘प्रोसेस इश्यू’चा दिलेला आदेश सत्र न्यायालयाने रद्द केला होता. सत्र न्यायालयाचा हा आदेश खंडपीठाने शुक्रवारी रद्द केला. परिणामी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश कायम राहिला. या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी खंडपीठाने ४ आठवड्यांची मुभा दिली आहे. तोपर्यंत खंडपीठाच्या या निर्णयाला स्थगिती असेल, असेही आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध ‘प्रोसेस इश्यू’चा आदेश दिला होता. त्याविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज मंजूर करीत प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला होता.
जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला अॅड. रंजना पगारे गवांदे आणि राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात आव्हान देत, सदरचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. शासनातर्फे सहायक सरकारी वकील प्रसन्ना कुट्टी आणि गवांदे यांच्या वतीने अॅड. जितेंद्र पाटील व अॅड. नेहा कांबळे यांनी काम पाहिले.
Web Title: Relief to Indurikar Maharaj
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App