Home अकोले भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारदरा : अहमदनगर जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाची सुरक्षा अहमदनगर पोलिसांनी तळीरामांच्या हातात दिली असून या धरणाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांसह बाहेरील तळीरामही आसरा घेताना आढळून येत आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटनस्थ्ळ. या पर्यटनस्थळाला दरवर्षी हजारो पर्यटक भेठ देण्यास उत्सुक असतात. पावसाळ्यात तर पर्यटकांचा महापूरच भंडारदऱ्याला लोटतो. याच भंडारदरा धरणाची सुरक्षा सध्या अहमदनगर पोलिसांकडे आहे. अहमदनगर विभागाच्या वतीने या धरणाच्या सुरक्षेसाठी आठ पालिसांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या धरणावर बऱ्याच दिवसांपासून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तर सोमवारी दुपारी भंडारदऱ्याच्या प्रमुख चौकात कहरच केला. एका चहाच्या टपरीवर जाऊन तेथे बसलेल्या महिलांना व त्या हॉटेलात काम करणाऱ्या गड्याला मला चहा नको जहर द्या अशी मागणी करत चहाचा ग्लास भिरकाऊन दिला आणि भर चौकामध्ये धिंगाणा घातला. या अगोदरही या धरणावर सध्या कार्यरत असलेल्या एका मद्यपी पोलिसाने पुण्यातील एका नामवंत पत्रकाराला अर्वाच्च भाषा वापरत शिवीगाळ केली होती. त्यावेळी राजूर विभागाचे तत्कालिन पोलिस अघिकाऱ्यायंना सदर कर्मचाऱ्.़याला समज देत या प्रकरणावर पडदा टाकला होता. सध्या भंडारदरा धरणाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या पोलिसांपैकी दोन पोलीस प्रचंड मद्यपान करून धांगडधिंगा करत असतात. भर चौकातून आपल्याजवळील दुचाकींवर दारूच्या बाटलया हातामध्ये नेवून त्या मिरवत असतात. या पोलिसांच्या दिमतील भंडारदरा धरणाच्या प्रवेशद्वारावरचे पाटबंधारे विभागाचे काही कर्मचारी असून तही यांच्याबरोबरच झिंगाट असल्याचे फार वेळा आढळून आले आहे. तसेच या धरणाच्या सररक्षा रक्षकाबारोबर गावातील तळीरामांचे फावले जात असून तेही या सुरक्षा रखकांसोबत धरणाच्या भिंतीवरच एकापाठोपाठ ऐक पेग रिचतव असतात.
त्यामुळे भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून एका प्रवेशद्वारावरच पोलीस कर्मचारी कार्यरत असताना दिसत असून दुसऱ्या प्रवेशद्वावरावर मात्र कोणताही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसून येत नाही. धरणाच्या सांडव्याजवळील प्रवेशद्वारावर बऱ्याचदा सताड उघडे दिसते. अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या या धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने वेळीच पावले उचलली नाही, तर त्याची नक्कीच भंडारदरा धरण शाखेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

Website Title:Bhandardara Dam Safety Question Is Serious, Police Administration Ignored

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here