Home अकोले अकोले: वाचाल तर वाचाल: लायन सुनिता कुलकर्णी. उषा देसाई बुक लायब्ररीचे उद्घाटन

अकोले: वाचाल तर वाचाल: लायन सुनिता कुलकर्णी. उषा देसाई बुक लायब्ररीचे उद्घाटन

सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथे उषा देसाई बुक लायब्ररीचे उद्घाटन.
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी- पुस्तकाचे वाचन असल्याशिवाय कोणताही माणुस खऱ्या अर्थाने शिक्षित किंवा जीवनात यशस्वी होत नसतो. म्हणूनच वाचाल तर वाचाल. असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रिमच्या अध्यक्षा लायन सुनिता कुलकर्णि यांनी केले. सत्यनिकेतन संचलित सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे( ता. अकोले) येथे नुकतेच द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज संचलित उषा देसाई बुक लायब्ररीचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी लायन सुनिता कुलकर्णि प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावरून बोलत होत्या.
 या प्रसंगी  लायन्स क्लब पुणे सुप्रीम प्रकल्प प्रमुख लायन अशोक मिस्त्री, लायन उषाताई देसाई, लायन सिमा दातार, लायन रोहिणी नागवनकर, लायन शैलेश गोडसे, लायन सुनिल ओक, लायन जयंत कुलकर्णि, लायन प्रफुल्ल देसाई, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे, संचालक तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी देसाई कुटुंबीयांनी पंचवीस हजार रुपये किंमतीचे तसेच लायन शैलेश गोडसे यांचेकडून दहा हजार रूपये किंमतीचे पुस्तके विद्यालयास मोफत देण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे हे होते.
लायन सुनिता कुलकर्णी या पुढे बोलताना म्हणाल्या कि, आजची गुंतवणुक हि भविष्याची बांधीलकी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ काढून पुस्तकाचे वाचन वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरण, वैद्यकीय सेवा यांसारखे उपक्रम वंचितांपर्यंत पोहचवण्याचे कार्यही करत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एन. कानवडे यांनी कल्पना या इतिहासाच्या घडणीला मार्गदर्शक ठरतात. यासाठी देसाई कुटुंबीयांच्या मार्फत राबवलेला लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गोरोद्गार काढले.
यावेळी लायन उषाताई देसाई यांनी स्पर्धा ही शास्त्राचा आत्मा आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचे पुस्तके अभ्यासुन विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या. असे विचार प्रतिपादीत करून विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जेष्ठ शिक्षक दिपक पाचपुते यांनी ज्ञानाच्या उपयोजनांशिवाय शहाणपण प्रगट होत नाही. म्हणूनच आयुष्यातला अंधार निवारणारी ज्योत म्हणजेच पुस्तकाचे वाचन आहे. यासाठी विदयालयास ग्रंथालय आवश्यक असल्याचे मत प्रतिपादित केले.
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड यांनी केले. तर नानासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Website Title: Svm Khirvire Library Inovation sunita Kulkarni

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here