Home अकोले भंडारदऱ्यात कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न एैरणीवर

भंडारदऱ्यात कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न एैरणीवर

भंडारदरा : महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा या पर्यटनस्थळावर टवाळखोरांची दहशत वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.  या टवावळक्षोरांना वेळीच आवर घालता आला नाही, तर भंडारदरा येथे महीलांना एकटे फिरणेही अवघड होणार आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील खेड्यापाड्यांसाठी शेंडी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी विशेषत: बँक, शाळा, महाविद्यालय, बाजारहाट या कारणास्तव आजूबाजुच्या गावातील नागरिकांची कायमच रेजचेल असते. भंडारदरा हे महत्वपूर्ण पर्यटनस्थ्ळ असून या पर्यटनस्थळाला वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे भंडारदरा येथे कायम वर्दळ असते. यामध्येच काही तरूण टवाळखोर आपापसातील राग, द्वेष, वैरापोटी भर बाजारपेठत सिनेस्टाईल मारामारी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करत हिरोगिरी करतात, तर काही ठवाहक्षोर तरूण भंडारदरा धरणाच्या परिसरातील गार्डनचा पूल, पत्रीपूल, कॉलेज परिसर तसेच रस्त्यावर वेडीवाकडी वळणे असलेल्या भागात उभे राहून जाणीवपूर्वक कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिंनींना त्रास देत असतात. मात्र्‍, भंडारदऱ्याच्या शेंडीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा धाक नसल्याने त्यांची मुजोरी अधिकच वाढत चालली असून त्याचा फटका स्थानिक नागरिक, व्यापारी यांना बसत आहे, या दहशतीमुळे भंडारदरा पर्यटनस्थळदेखील बदनाम होत आहे.

पर्यटक भयभीत झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे काही वर्षापूर्वी सुसज्ज्‍ असे पोलीस दूरक्षेत्र होते. याता दोन निवासी पोलीस कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी असे कुठलेही अनुचित प्रकार घडत नव्हते. मात्र कालांतराने येथील पोलीस चौकी बंद झाल्यानंतर असे प्रकार घडण्यास सुरुवात झाली.

याबाबत भाजपाचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे व सरपंच दिलीप भांगरे यांच्यासह ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली. तत्कालिन जिल्हा पोलीस प्रमुखांनी पाहणी करून चौकशी अहवाल मागविला; मात्र फक्त्‍ कागदोपत्री घोडे नाचवून येथे अद्यापही पोलीस चौकी सुरू झाली नाही. याशिवाय भंडारदरा धरणावर असणाऱ्या आठ पोलीस सुरक्षा रक्षकांना धरणाची सुरक्षा सोडून राजूर पोलीस स्टेशन अतिरिक्त काम लावत आहेत. धरणावर मात्र प्रत्यक्षात एक किंवा दोनच पोलीस हजर असतात. हेच पोलीस कर्मचारी जर भंडारदरा येथील पोलीस चौकीत थांबविल्यास भंडारदऱ्यातील टवाळखोरांवर खाकीचा वचक बसून दहशत थांबविण्यास मदत होईल. राजूर पोलीस स्टेशनला नुकतेच आलेले नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यापुढे या समस्येचे मोठे आव्हान असून त्यांच्या कामगिरीवर भंडारदरावासियांचे लक्ष लागले आहे.             

Website Title: The question of law and order in Bhandardara is on the field.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here