Home अकोले भंडारदरा: अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

भंडारदरा: अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

भंडारदरा: अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

भंडारदरा: अकोले तालुक्यातील बारी जहागीरदार वाडी या गावामध्ये डोहात अंगोळीला गेलेल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. नवरात्र उत्सवाच्या पूर्वाश्रमीला ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

सूरज गोरख कर्टूले (वय 12) आणि सुप्रिया रामदास खादे (वय 12) ही दोन लहान मूल काल कपडे धुण्यासाठी कळसूबाई डोंगराच्या कडेला असणार्‍या डोहाकडे गेली होती. त्याच वेळी तेथे एक महिला कपडे धूत होती. या मुलांना तिने दुसर्‍या डोहाकडे अंघोळीला जाण्यास मज्जाव केला होता. परंतु त्या महिलेची नजर चुकवून ही मुलं त्या डोहामध्ये उतरली. मुलं न दिसल्याने महिलेने दुसर्‍या डोहाकडे धाव घेत पहिले असता तिला मुलांचे कपडे डोहाच्या बाजूला पडलेले दिसले. तिने आरडा ओरड करत माणसे गोळा केली. त्यांनी शोध घेतला असता दोन्ही मुले पाण्यात मृतावस्थेत आढळून आली. दोन्ही मुलांवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही सहावीच्या वर्गात शिकत होते.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here