Home महाराष्ट्र सैराट वृत्ती: सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई वडिलांनी केली मुलीची हत्या

सैराट वृत्ती: सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई वडिलांनी केली मुलीची हत्या

सैराट वृत्ती: सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई वडिलांनी केली मुलीची हत्या

मंगळवेढा: सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या वडिलांनी सावत्र आईच्या मदतीने बी.ए.एम.एस. चे शिक्षण घेणाऱ्या मुलीची घरात हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवेढ्यातील सलगर बु. येथे उघडकीस आला. महत्वाचे म्हणजे विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांनी तिला माहेरी आणले होते. दरम्यान विवाहितेला अगोदर विषारी इंजेक्शन देऊन मारले. यात एका डॉक्टरसोबत आणखी दोन तीन जणांचा समावेश असल्याची चर्चा गावात सुरु आहे.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

विठ्ठल बिराजदार यांच्या शेतात नात्यातलाच मुलगा श्रीशैल बिरादार हा सालगडी म्हणून काम करत होता. यातूनच त्याचे आणि विठ्ठल यांची मुलगी अनुराधा यांचे सुत जुळले. याची माहिती मिळाल्यानंतर विठ्ठल यांनी मारहाण करून कामावरून काढले होते. चार वर्षापूर्वी त्याला कामावरून काढले होते. त्यानंतरही तो आणि अनुराधा संपर्कात होते. १ ऑक्टोबरला विजापूर मधील इडी येथे विवाह केला. विवाह झाल्यानंतर त्याने तिला सिंदगी येथील घराजवळील महाविद्यालयात सोडले. महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनुराधाने विवाह केल्याचे समजले. त्यांचा तिच्या वडिलांशी परिचय होता. त्यामुळे त्यांनी हि माहिती त्यांच्या कानावर घातली. विठ्ठल तातडीने अनुराधाला घ्यायला आले. त्यांनी २ ऑक्टोबर ला पाहते दीड वाजता बोरले येथील मुलीचे मामा व फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे तिला सोडले.

अनुराधाच्या प्रेमविवाहामुळे होणारी बदनामी सहन होणार नाही असे सांगून त्यांनी बाळासाहेब यांना विवाहाची माहिती दिली. माझी बदनामी झाली आहे. तिला आता जिवंत ठेवणार नाही आसे सांगून ते घरी गेले. ४ ऑक्टोबर ला दुपारी दिड वाजेच्या सुमारास विठ्ठल बोराळे येथे आले. त्यांनी बाळासाहेब यांना अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे असे सांगत इनोव्हा गाडीने घरी नेले. ५ ऑक्टोबरला पहाटे अनुराधाचा मृत्यू झाल्याचा फोन विठ्ठल यांना केला. बाळासाहेब घरी पोहोचेपर्यंत अनुराधावर अंत्यसंस्कार हि झाले होते. यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले.तिथे घटनेची तक्रार नोंदवली. दरम्यान शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास न्याय व विधी शाखेचे पथक बिराजदार यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी अनुराधाला जाळले त्या ठिकाणचे नमुने घेतले.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here