Home अकोले भंडारदरा अपडेट: धरण पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू, २४ तासांतील पाउस

भंडारदरा अपडेट: धरण पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू, २४ तासांतील पाउस

Bhandardara Update: भंडारदरा धरण पाणलोटात गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे, धबधबे आता आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले.

Bhandardara Update Heavy rains continue in the dam catchment area

भंडारदरा:  उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघरला 157 मिमी पावसाची नोंद झाली. रतनवाडीतही जोरदार पाऊस कोसळत आहे.

भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत गत पाच दिवसांपासून मान्सून सक्रिय आहे. कमी अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या. पण काल कोकणकडा, कळसूबाई शिखर, घाटघर, रतनवाडी आणि पांजरेत जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धबधबे आता आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. घाटघर आणि रतनवाडीत अधूनमधून धो धो पाऊस कोसळत असल्याने या भागातील ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. पाणलोट धुक्यांनी लपेटून गेला असून भात खाचरांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. संततधार सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 79, घाटघर 157, रतनवाडी 135, वाकी 57.

11039 दल घफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 5290 दलघफू होता. निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. वाकी तलावातील पाणीसाठा वाढु लागला असून हा तलावातील पाणीसाठा निम्मा होणार आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 50 दलघफू पाणीसाठा होता. पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणलोटात शेती कामांनी वेग घेतला आहे.

गेल्या २४ तासांत भंडारदरा येथे ७९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटघर येथे १५७ मि. मी. पाऊस पडला, तर पांजरे येथे १५७ मि. मी.. रतनवाडी १३० मि. मी. तर वाकी येथे ५७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणाचा गुरुवारी पाणीसाठा ५२७० दलघफू असून, वीज निर्माण केंद्रातून ८३७ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू आहे, तर नवीन १०३ द. ल. घनफूट पाण्याची आवक झाली आहे.

Web Title: Bhandardara Update Heavy rains continue in the dam catchment area

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here