Home Accident News विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात एक ठार, सात जखमी

विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात एक ठार, सात जखमी

Satara:  विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना.

Devotees on their way to visit Vitthala were attacked, one killed and seven injured in the accident

सातारा: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे. कार अपघातामुळे या भाविकांचे विठुरायाच्या भेटीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या गाडीला लोधवडेनजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण ठार, तर ७ जण जखमी झाले. कल्याण भोसले असे मृताचे नाव आहे. जखमी झालेले सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीचे रहिवासी आहेत. घटनास्थळी दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.

आषाढी एकादशीनिमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे कारने (एमएच ११ बीएच ०८९६) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. गाडीतून चालक कल्याण भोसले (वय ४५), अण्णा गाढवे (४२), पपू भिसे (४०), दादासो थोरात (४२), सागर भोसले, विजय माने (४५), श्रीमंत पवार (५०), रुद्र भोसले (सर्व रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) हे आठ जण प्रवास करत होते. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरून गाडी उंच उडाली अन थेट चार वेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली.

अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. रुद्र भोसले (वय १३) हा देखील गाडीत होता. तो सर्वांना धीर देत होता. जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून पुढील उपचारासाठी साताऱ्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सपोनि. अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Web Title: Devotees on their way to visit Vitthala were attacked, one killed and seven injured in the accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here