Home क्राईम महिलेचा अपघातात कारमध्ये होरपळून मृत्यू, पतीला बेड्या, धक्कादायक कारण आले समोर

महिलेचा अपघातात कारमध्ये होरपळून मृत्यू, पतीला बेड्या, धक्कादायक कारण आले समोर

Jalna crime : अपघातानंतर कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना, अपघाताप्रकरणी (accident) आता धक्कादायक माहिती समोर, मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार, पतीविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल.

Woman dies in a car accident, husband Murder Crime Filed

जालना: जालनामध्ये  एका महिलेचा अपघातानंतर कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  आठवड्याभरापूर्वी गाडीला मागून धडक दिल्यानंतर पती वाद घालण्यासाठी गाडीतून खाली उतरल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि त्यामुळे पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पतीने पोलिसांनी दिली होती. पण या अपघाताप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूल होत नाही म्हणून आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये सूनेचा छळ केला होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 24 जून रोजी जालना जिल्ह्यातील तळणी फाटा रोडवर कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनेच हे भयंकर कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सविता अमोल सोळंखे असे 33 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून तिचे लग्न अमोल याच्याशी झाले होते. दोघांच्या लग्नाला तेरा वर्ष होऊनसुद्धा त्यांना मुलबाळ होत नव्हतं. त्यामुळे अमोल सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. तसेच वारंवार सविताकडे घटस्फोटाची मागणी करायचा. मात्र घटस्फोट देण्यास सविता नकार दिला होता. याचाच राग मनात धरून अमोलने आपल्या पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव केला. मात्र पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करत अमोलला अटक केली आहे.

जालना जिल्ह्यातील तळणी फाटा रोडवर 23 जून रोजी पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी शेगाव येथून आपल्या गावाकडे परत येत होते. याच दरम्यान  त्यांच्या स्विफ्ट कारला मागून येणाऱ्या एका पीकअप गाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला होता आणि क्षणार्धातच आगीनं संपूर्ण कार जळाली. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती आणि वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं स्थानिक पोलिसांना सांगण्यात आले. या अपघातात सविता सोळुंके (33) या महिलेचा मृत्यू झाला. महिला जळाल्यानंतर अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली होती.

Web Title: Woman dies in a car accident, husband Murder Crime Filed

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here