Home अहमदनगर पट्ट्याने गळा आवळून अज्ञाताची हत्या; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

पट्ट्याने गळा आवळून अज्ञाताची हत्या; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Ahmednagar News: केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना.

Murder of unknown person by strangulation with belt

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने या घटनेतून तरुणी वाचली. ही घटना ताजी असतानाच अहमदनगरनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे सत्रच सुरू आहे. शहरातून पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अंदाजे पस्तीस वर्षीय इसमाचा खून केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एका वीट भट्टीजवळ हा तरुणाचा मृतदेह सापडला. ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणाचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Murder of unknown person by strangulation with belt

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here