धक्कादायक! शाळकरी मुलांना चॉकलेच्या रॅपरमधून दिली जातेय भांग
Breaking News | Akola: लहान मुलांना चॉकलेटमधून भांग दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस.
अकोला: अकोल्यात लहान मुलांना चॉकलेटमधून भांग दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे अमली पदार्थांमुळे तरुणाईचे जीवन धोक्यात आहे, तर दुसरीकडे अकोल्यात भांगेच्या विक्रीने लहान मुलांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरात शाळेजवळ चक्क चॉकलेटच्या रॅपरमधून भांग विक्री केली जात आहे. समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा आला होता. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात त्यांना हे चॉकलेट दिसले. चॉकलेट अन्य चॉकलेटपेक्षा वेगळं होतं. त्यामुळे मनात शंका आल्याने त्यांनी शहानीशा केल्यावर यात भांग असल्याचं समजलं आहे.
आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपर मध्ये भांग दिसून आली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभाग तसेच पोलीस प्रशासन लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी घातली आहे.
सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषीमाता मंदिराजवळ असलेल्या चहाच्या दुकानात ही मुलं आली होती. चार मिनार गोल्ड मनुका या नावाचे चॉकलेट त्यांच्या हातात होते. पोलिसांनी या घटनेबाबत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती यावेळी सरनाईक यांनी केली आहे.
Web Title: Bhang is being given to school children in a chocolate wrapper
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study