Home संगमनेर संगमनेर: महावितरण कंपनीतील कामगाराला मारहाण

संगमनेर: महावितरण कंपनीतील कामगाराला मारहाण

Breaking News | Sangamner Crime: कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.

Sangamner Crime Maha distribution company worker beaten up

संगमनेर:  महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या  एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील रामनगर परिसरात नुकतीच घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक देवीदास कडू (रा. मालदाड रोड) संगमनेर हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शहर कक्षामध्ये कंत्राटी कामगार म्हणून  नोकरी करीत आहेत. शहरातील रामनगर परिसरात बीज बिल वसुलीचे काम ते काम करतात. शनिवारी (दि. २) रात्री रामनगर परिसरातील फोन आला. हे काम पूर्ण करून ते आपल्या सहकायाँ सह कार्यालयाकडे येत होते. वेळी आशा शिंदे, मंगल शिंदे यांनी त्यांना थांबवून आम्ही तक्रार केली होती. तेव्हा तुम्ही आले नाही आता कसे आले, अशी विचारणा केली. या महिलांनी कामगाराला शिवीगाळ  करून मारहाण केली. या ठिकाणी उभे  असलेल्या विकास पवार यानेही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अभिषेक कडू यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आशा शिंदे, मंगल शिंदे , विकास पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sangamner Crime Maha distribution company worker beaten up

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here