Home संगमनेर संगमनेर: हळदी समारंभात नवरीचे पंधरा तोळे सोने लंपास

संगमनेर: हळदी समारंभात नवरीचे पंधरा तोळे सोने लंपास

Breaking News | Sangamner: नवरीचे तब्बल पंधरा ते सोळा तोळे सोन्याचे दागिने (Gold theft) असलेले गाठोडे लंपास झाल्याने या मंगलकार्यालयात एकच गोंधळ.

Fifteen tola gold theft of bridegroom in Haldi ceremony

संगमनेर:  मंगल कार्यालयात नवरा नवच्या हळदीचा जल्लोष सुरू होता. दोन्ही कडील कलवरे नाचण्यात दंग तर वऱ्हाडी आपल्या आनंदात, भेटीगाठीत दंग. असा सर्व माहोल मंगलकार्यालयात सुरू असताना दोन जणांची नजर मात्र एका आजीवर खिळली होते. या दोन (वऱ्हाडी नसलेल्या) भामट्यांनी या आजीबाईची नजर चुकवून तिचे गाठोडे लंपास केले. नवरीचे तब्बल पंधरा ते सोळा तोळे सोन्याचे दागिने असलेले गाठोडे लंपास झाल्याने या मंगलकार्यालयात एकच गोंधळ उडाला आणि येथील आनंदावर एकदम विरजण पडून सर्व वऱ्हाडी चोर चोर म्हणून चोराचा शोध घेऊ लागले.

ही धक्कादायक घटना नगर रोडवरील एका मोठ्या मंगल कार्यालयात रविवारी रात्री हळदी समारंभात घडली. याबाबत माहिती अशी की, समनापूर गणपती मंदिराजवळील एका सुसज्ज मंगल कार्यालयात तालुक्यातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलीचा आज सोमवारी लग्न सोहळा पार पडला. दरम्यान रविवारी रात्री या मंगल कार्यालयात वधू – वराचा हळदी सोहळ्याचा मोठा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. तर या सोहळ्यासाठी वधू-वर या दोन्हींकडील पाहुण्यांची मोठी उपस्थिती होती. मोठ्या घरचा लग्न सोहळा असल्याने सर्वच वऱ्हाडी टापटिपमध्ये होते. त्यामुळे यात चोर कोण? आणि पाहुणे कोण? हे ओळखणे अवघड होते. पाहुण्यांची संख्या मोठी असल्याने कोणीकोणाला फारसे ओळखीचे नसल्याने फार विचारपूस होत नव्हती. दरम्यान वधु- वराला हळद सुरू झाल्याने या मंगल कार्यालयात हळदीचा एकच जल्लोष सुरू होता. डीजेचा आवाज, हळदीचा जल्लोष व त्यावर थिरकणारे वऱ्हाडी असा सगळा आनंदी माहोल असतांना वधूचे दागिणे एका गाठोड्यात ठेऊन एक आजीबाई कोपरा धरून बसली होती. यावेळी दोघेजण टापटिप पोशाखामध्ये तिच्याजवळ घुटमळत होते. आजीबाई मात्र हे गाठोडे धरून कार्यक्रमाचा आनंद घेत होती. मात्र या आनंदात तिच्या या गाठोड्याकडे तिचे दुर्लक्ष झाले आणि हिच संधी साधून या दोन चोरट्यांनी तिचे गाठोडे चोरून धुम ठोकली. या गाठोड्यात नवरीचे तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिणे होते.

ही घटना समजताच मंगल कार्यालयातील आनंदावर विरजण पडून सर्वजण चोरीचा तपास करू लागले. तसेच येथील तिसरी नजर असलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासले असता झालेला सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यात दोन जणांनी पाळत ठेऊन या आजीबाई जवळ असलेले गाठोडे अलगदपणे चोरून नेल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. सोमवारी दुपारी लग्न सोहळा असल्याने याबाबद दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Fifteen tola gold theft of bridegroom in Haldi ceremony

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here