Home क्राईम संगमनेरातील घटना : भोंदू बाबाचा प्रताप, बहिणीला बरे करण्यासाठी मागितले एका महिलेचे...

संगमनेरातील घटना : भोंदू बाबाचा प्रताप, बहिणीला बरे करण्यासाठी मागितले एका महिलेचे केस

Sangamner Crime: भगताच्या (भोंदू, Bhondu Baba) सांगण्यावरून मागासवर्गीय समाजातील महिलेच्या डोक्यावरील केस घेण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या दोघांवर गुन्हा दाखल.

Bhondu Baba Pratap, a woman's hair asked to heal her sister

संगमनेर: बहीण आजारी असल्याने समूळ एका भगताच्या (भोंदू) सांगण्यावरून मागासवर्गीय समाजातील महिलेच्या डोक्यावरील केस घेण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. १८) सकाळी १० आणि संध्याकाळी ५ ते ६.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मालुंजे गावात घडला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष विठोबा निठवे (वय ३१, रा. डिग्रस, ता. संगमनेर), भाऊसाहेब रामा कुदनर (वय ४१, रा. शिंदोडी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध मागासवर्गीय समाजातील ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यांचे उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) प्रमाणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला.

फिर्यादी महिला कुटुंबातील सदस्यांसोबत राहते. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निठवे आणि कुदनर हे दोघे महिला राहत असलेल्या घरासमोर आले, काही वेळाने ते तेथून निघून गेले. शेतात काम करत असलेल्या या महिलेने घरी आल्यानंतर त्या दोन व्यक्तींबद्दल सुनेला विचारले. त्या व्यक्तींनी मला गायी पाहण्यासाठी आल्याचे तिने सांगितले. पुन्हा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते दोघे तेथे गेले असता फिर्यादी महिलेने त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यातील एकाने सांगितले की, ‘माझी बहीण आजारी आहे, भगताने मला मागासवर्गीय समाजातील महिलेच्या डोक्याचे केस आणायला सांगितले तुम्ही केस देता का?, अशी विचारणा केली. त्यानंतर महिलेने केस देण्यास नकार दिला. त्यानंतर तेथून ते मोटारसायकलवरून निघून गेले.

याबाबत फिर्यादी महिलेने तिच्या मुलाला सांगितले. काही वेळाने मुलाच्या मोबाईलवर तोंडओळख असलेल्या संतोष निठवे याचा फोन आला. त्याने माझी बहीण आजारी असल्याने केस लागत होते. तुमच्या घरी आलो होतो. मला केस भेटले नाहीत, ते घेऊन दे, असे निठवे म्हणाला. फिर्यादी महिलेच्या मुलाने निठवे याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी समाजातील लोक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, पोलीस पाटील तेथे होते. मागासवर्गीय समाजातील महिलेच्या डोक्यावरील केस मागून आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bhondu Baba Pratap, a woman’s hair asked to heal her sister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here