Home संगमनेर संगमनेर: उड्डाणपुलावरून कार डिव्हायडरला धडकून थेट रस्त्यावर पलटी, दोघे ठार

संगमनेर: उड्डाणपुलावरून कार डिव्हायडरला धडकून थेट रस्त्यावर पलटी, दोघे ठार

Sangamner Accident:  कार अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर.

Sangamner Accident car hit the divider from the flyover and overturned directly on the road, killing two

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर उड्डाणपुलावर कार डिव्हायडरला धडकून थेट रस्त्यावर येऊन तीन ते चार वेळा पलटी झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अभिषेक साहेबराव रहाणे (वय 29, रा.चंदनापुरी, ता.संगमनेर), प्रथमेश विकास कुरकुटे (वय 23, रा.कुरकुटवाडी, बोटा, ता.संगमनेर) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे असून विजय तबाजी काळे (वय 35, रा.पावबाकी रस्ता, संगमनेर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रहाणे, कुरकुटे आणि काळे हे तिघेही कारमधून संगमनेरकडे येत होते. हे तिघेही वाढदिवसासाठी चालले होते. ते कारघेऊन संगमनेर शहराच्या जवळ असलेल्या हिवरगाव पावसा शिवारात आले.

उड्डाणपुलाहून जात असताना कार डिव्हायडर धडकून थेट खाली कोसळली. त्यानंतर कार तीन-चार वेळा उलटल्याने कारमधून प्रवास करणारे तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. परंतू रक्तस्त्राव अधिक होऊन अभिषेक रहाणे आणि प्रथमेश कुरकुटे या दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या विजय काळे या तरुणाला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात नाशिक-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच सव्हिर्स रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत खराब आहेत. अनेकदा मागणी करूनही रस्त्याची कामे केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणचे नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.आले.

Web Title: Sangamner Accident car hit the divider from the flyover and overturned directly on the road, killing two

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here