Home अकोले अकोले तालुक्यात घरात घुसून बिबट्याचा वृद्धावर हल्ला

अकोले तालुक्यात घरात घुसून बिबट्याचा वृद्धावर हल्ला

Akole taluka Bibatya Attack: बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द जखमी झाल्याची घटना तालुक्यातील निंब्रळ येथे घडली.

Bibatya attack an old man after entering a house in Akole taluka

अकोले: बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द जखमी झाल्याची घटना तालुक्यातील निंब्रळ येथे घडली. निवृत्ती सयाजी उघडे (वय ८०) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. जखमी वृध्दावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात रखमाबाई तुकाराम खडके या वृद्ध महिलेचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास निंब्रळ येथील निवृत्ती उघडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. उघडे हे घरात झोपलेले असताना बिबट्या त्यांच्या घरात घुसला. उघडे यांच्या अंगावर चादर असल्यामुळे विवट्याच्या हल्ल्याची तीव्रता कमी झाली. यावेळी झालेल्या झटापटीत वृद्ध निवृत्ती उघडे यांच्या हाताला बिबट्याने चावा घेतल्याने हाताला जखम झाली आहे. आरडा-ओरडा केल्यामुळे बिबट्याने घरातून पळ काढला. मात्र बिबट्याने वृध्दाच्या अंगावर असलेली चादर तोंडात घेऊन पोबारा केला आहे.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

या घटनेची माहिती समजताच राजूर विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी निंब्रळ येथे जाऊन पाहणी केली. राजूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमी वृद्ध निवृत्ती उघडे यांना अकोले ग्रामीण रुणालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचार नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Bibatya attack an old man after entering a house in Akole taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here