Home संगमनेर संगमनेर घटना: पतसंस्थेच्या संचालकावर बिबट्याचा हल्ला, दुचाकीवरून जात असताना…

संगमनेर घटना: पतसंस्थेच्या संचालकावर बिबट्याचा हल्ला, दुचाकीवरून जात असताना…

Sangamner News: शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने (Bibatya attack) दुचाकीवरून चाललेले गिते यांच्यावर अचानक हल्ला.

Bibatya attack on director of credit institution

संगमनेर: तालुक्‍यातील पिप्रीं- लोकी अजमपूर शिवारात रविवारी सकाळी 9 विजेच्या सुमारास अश्विनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र लहानु गिते (वय 45) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून दैव बलवतर म्हणून गिते थोडक्‍यात बचावले.

राजेंद्र गिते हे रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घराकडून आपल्या शेताकडे दुचाकीवरून चालले होते. यावेळी पिप्रीं- लौकी अजमपूर शिवारातील तसेच दाढ खुर्द शिवेलगत असलेल्या गिते मळा येथील लोखंडी पुलाजवळून आले होते. यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने गिते यांच्यावर अचानक हल्ला केला.

त्यामुळे राजेंद्र गिते हे दुचाकीवरून खाली कोसळले परंतू, त्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडा- ओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गिते मळा येथील नागरिकांनी तिकडे धाव घेतल्याचे पाहून बिबट्याने झुडपात पलायन केले. यावेळी बिबट्याने पंजा मारल्याने गिते यांच्या उजव्या पायाच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.

यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने राजेंद्र गिते यांना प्राथमिक उपचारासाठी दाढ बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मागील अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी केली आहे.

Web Title: Bibatya attack on director of credit institution

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here