Home अकोले अर्ध्या रात्री मेंगाळ यांनी भागवली ग्रामस्थांची तहान

अर्ध्या रात्री मेंगाळ यांनी भागवली ग्रामस्थांची तहान

Sangamner | Akole: (thirst of the villagers) टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी लोकं हंडाभर पाण्यासाठी वण वण करत भटकंती करतात असच चित्र पठार भागातील.

Mengal quenched the thirst of the villagers in the middle of the night

संगमनेर: विधानसभा मतदार संघातील तसेच संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथिल (पिपरदरा) या ठिकाणी 250 ते 300 इतकी लोकसंख्या असलेली आदिवासी समाजाची लोक वस्ती आहे.गावापासून लांब असल्याने अनेक विकास कामांपासून हे वस्ती दुर्लक्षित आहे. रस्ता,लाईट पाणी असे मूलभूत प्रश्न देखील अजून प्रलंबित असल्याचे वास्तव वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आला आहे.

अकोले विधानसभा मतदार संघातील तसेच संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा उंचीवर असल्याने या भागात कायम पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतात त्या सध्या जून महिना संपत आला असून देखील सुद्धा पाऊस कुठ दिसत नाही. टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी लोकं हंडाभर पाण्यासाठी वण वण करत भटकंती करतात असच चित्र पठार भागातील भोजदरी येथील (पिपरदरा ) येथील आदिवासी समाजाच्या लोक वस्ती मधे पाहायला मिळाले .अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे शुक्रवारी पठार भागाच्या दौऱ्यावर होते या भागातील अनेक सामाजिक उपक्रमांना भेटी देऊन ते संध्याकाळी 6 च्या सुमारास भोजदरी येथील (पिपरदरा ) या वाडीला भेट दिली या प्रसंगी येथील महिलांनी वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मेंगाळ यांच्या कडे मांडला.या वाडीतील ग्रामस्थ ज्या विहिरीवरून पाणी पिण्यासाठी आणत होते त्या विहिरीचे पाणी आधल्या दिवशी संपले होते.या वाडीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे पाणी टँकर सुरू होण्यासाठी मागणी केली होती मात्र प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक्षात टँकर सुरू होण्याकरिता 10 ते 15 दिवसांचा कालावधी जाणार होता .आज रात्री या भागातील विहिरीचे पाणी संपले आहे उद्या कुठून पाणी आणायचे असा प्रश्न या वाढतील नागरिकांचा निर्माण झाला होता वाडीतील काही प्रमुख लोकांनी शेजारील एक दोन शेतकऱ्यांकडे ज्यांच्या विहिरींना थोडफार पाणी आहे अश्या शेतकऱ्यांकडे पिण्यासाठी पाणी द्या अशी मागणी केली होती मात्र मुळात त्या सर्व विहिरींना पाणी कमी असल्याने त्यांना या बाबतीमध्ये पाहिजे तितके यश आले नाही .सर्व प्रयत्न अक्षरशः संपले होते.आताचा प्रश्न मिटला पण उद्याचे काय ? कुठून पाणी आणायचे? आजू बाजूच्या विहिरींचे पाणी संपले ? आता काय करायचे  ? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले होते.ही सगळी व्यथा या वाडीतील महिला रात्री 8 वाजता मेंगाळ यांच्या कडे मांडत होत्या.साहेब काही पण करा पण आम्हाला पाणी द्या.उद्या आम्हाला पाणी नाही.हे सगळे प्रश्न मेंगाळ यांनी समजून घेतले आणि या सर्व ग्रामस्थांना तुम्ही काळजी करू नका आपण काहीतरी मार्ग काढू.अशा आशावाद धिला आणि मेंगाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पुढे गेले बोटा येथे गेल्या नंतर रात्री 10 वाजता   पांडू शेळके यांच्या मदतीने टँकर उपलब्ध केला आणि रात्री 12 च्या.सुमारास उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या मदतीने भोजदरी ( पिपरदरा) येथे टँकर पाठवण्यात आला .टँकर आला हे पाहता महिलांची  पिण्याच्या पाण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळाली .सर्व महिलांनी घरातील भांडे भरून घेतले उरलेले पाणी शेजारील एका विहिरी मधे सोडण्यात आले नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा या वाडीसाठी 3 टँकर पाठवण्यात आले ते तिन्ही टँकर त्या विहिरी मधे खाली करण्यात आले असून किमान आता 15 ते 20 दिवसाची या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

पाऊस लांबला आणि पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा टँकर ची सुविधा करू अशी ग्वाही मेंगाळ यांनी दिली आहे.पिण्याच्या पाण्यापासून या नागरिकांना आपण वंचित ठेवणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मेंगाळ यांच्या तत्पुरते मुळे या नागरिकांना पाणी मिळाल्याने सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होत आहे. अर्ध्या रात्री या वाडीतील ग्रामस्थांची तहान मेंगाळ यांनी भागवल्या मुळे सर्व ग्रामस्थांनी मेंगाळ यांचे आभार मानले.

Web Tile: Mengal quenched the thirst of the villagers in the middle of the night

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here