संगमनेर: पाच वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला, शेतात खेळत असताना….
Sangamner News: ५ वर्षीय बालिका घरापासून ते शेतात व शेतातून घराकडे अशी खेळत असताना गिन्नी गवताच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला (Bibatya Attack) केल्याची घटना.
संगमनेर: ५ वर्षीय बालिका घरापासून ते शेतात व शेतातून घराकडे अशी खेळत असताना गिन्नी गवताच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील बिरोबा वस्ती येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सदर बालिका गंभीर जखमी झाली आहे.
ईश्वरी विजय बालोडे (वय 5) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. ईश्वरी ही घरासमोरील अंगणात खेळत होती. तर तिची आई ही समोरील शेतात गवत काढत होती. ईश्वरी ही घरापासून ते शेतात व शेतातून घराकडे अशी खेळत होती. दरम्यान जवळच असलेल्या गिन्नी गवताच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज झाला. जवळच असलेल्या ईश्वरीच्या आईने आवाजाच्या दिशेने पाहिले तर बिबट्याने मुलीला उचलले होते. आईने आरडाओरड केल्याने बिबट्याने मुलीला सोडत धुम ठोकली. जखमी अवस्थेत आईने ईश्वरीला उचलले.
ईश्वरी गंभीररित्या जखमी झाल्याने तिच्या डोक्यातून मोठ्याप्रमाणावर रक्तश्राव सुरु होता. घटनेची माहिती कळताच सोमनाथ गुंजाळ, मिलींद कानवडे, डॉ. सुरेश बालोडे, मोहन गुंजाळ, उपविभागीय वनअधिकारी संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वन परिमंडल अधिकारी संगीता कोंडार, वनरक्षक आर. एस. कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ईश्वरीला संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Bibatya attack on five-year-old girl
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App