Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सहा वेगवेगळ्या घटनांनी तालुका हादरला! पाच जणांचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात सहा वेगवेगळ्या घटनांनी तालुका हादरला! पाच जणांचा मृत्यू

Sangamner News: संगमनेर तालुक्यात अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत सहा वेगवेगळ्या घडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Accident Six different incidents rocked the taluk in Sangamner taluka Five people died

संगमनेर: संगमनेर तालुक्यात  वेगवेगळ्या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे तालुक्यात रविवार अपघातवार झाला आहे पहिल्या घटनेमध्ये संगमनेर तालुक्या तील निळवंडे गावाजवळ अनुकूल सत्यवान मेंढे (वय 21, रा. देवी गल्ली) संगमनेर हा तरुण गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला चालला होता. तो निळवंडे जवळील रस्त्यावर मित्रांसमवेत रस्त्याच्या कडेला उभा असताना अज्ञात एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात तो गंभीरत्या जखमी झाला.

त्याला जखमी अवस्थेत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तो मयत झाला असल्याचे घोषित केले व त्याचे दोन मित्रही जखमी झाले आहे. दुसरी घटनेत कोल्हार घोटी राज्य मार्गावर वडगावपान शिवारातील बंद पडलेल्या टोल नाक्यावर जवळ घडली. अमोल गजानन सानप (वय 30, रा. कऱ्हे, ता. संगमनेर ) वडगावपानकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात सानप याचा जागीच मृत्यू झाला. या प्रक रणी मेडीकव्हर हॉस्पिटलने खबर दिल्यानंतर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तिसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथील शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला असता या मयत महिलेची ओळख पटली असून तीचे नाव ज्योती संतोष पाटेकर (वय 38, रा. आरेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे निष्पन्न झाले. या प्रकरणी तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

चौथ्या घटनेमध्ये संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे काल रविवारी दुपारी 1 वाजता संदिप सोमनाथ डुंबरे (वय 38, धंदा शेती, रा. पेमगिरी) यांच्या मालकीच्या शेततळ्यात पुष्पा उत्तम डुबे (42, रा. पेमगिरी) ही महिला पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडली असता तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मृत्यूची नोंद झाली आहे.

पाचव्या घटनेत तालुक्यातील निमगांव टेंभी येथील आश्वीन बाबुराव वर्पे (वय 28, रा. निमगाव टेंभी) या तरुणीने  आपल्या राहत्या घरात छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारासाठी शहरातील कुटे हॉस्पिटल येथे आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषीत केले.

या दुर्दैवी घडलेल्या घटनांबाबत संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दिघे, पो. हेड. कॉ. एम. आर. सहाणे, हेड कॉ. वायाळ, हेड कॉ. एस. आर बढे, सहाय्यक फौजदार सय्यद आदिंसह कर्मचारी करत आहे. संगमनेर तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सहाव्या घटनेत ५ वर्षीय बालिका घरापासून ते शेतात व शेतातून घराकडे अशी खेळत असताना गिन्नी गवताच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील बिरोबा वस्ती येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सदर बालिका गंभीर जखमी झाली आहे. ईश्‍वरी विजय बालोडे (वय 5) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Accident Six different incidents rocked the taluk in Sangamner taluka Five people died

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here