Home अहमदनगर अहमदनगर: मयत व्यक्तीच्या नावावरील जमिनीची विक्री, सरपंचासह सात जणांवर गुन्हा

अहमदनगर: मयत व्यक्तीच्या नावावरील जमिनीची विक्री, सरपंचासह सात जणांवर गुन्हा

Ahmednagar News:  राहुरी तालुक्यातून धक्कादायक (Land fraud) प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन बनावट कागदपत्रे तयार करून चुकीची वारस नोंद, जमिनीची विक्री,  डिग्रस ग्रामपंचायतच्या सरपंचासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा.

Sale of land in the name of deceased, case against seven persons including sarpanch

राहुरी: राहुरी तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे मयत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन बनावट कागदपत्रे तयार करून चुकीची वारस नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर जमिनीची विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डिग्रस ग्रामपंचायतच्या सरपंचासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. यामधील  दोघा जणांना अटक केली. तर पाच जण पसार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना तुकाराम पवार यांचे वडील तुकाराम मुक्ताजी पवार हे 1986 साली तर आई छबुबाई या 2003 साली मयत झाले आहेत. त्यांच्या नावावर राहुरी तालुक्यातील डिग्रस गावठाण येथे सिटी सर्वे नं. 161 येथे 253 चौरस मिटर जमिन होती. त्यांना दोन मुले व दोन मुली असे चार वारस होते. सदर जागेवर त्यावेळी वारस नोंद करण्याचे राहुन गेले होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी संगनमत करून खोटे कागदपत्रे व खोटे घोषणापत्र शासकीय कार्यालयात सादर करुन सदर जमीनीवर साखरबाई मुरलीधर पटारे रा. तीनवाडी, हरेगाव, ता. श्रीरामपूर ही महिला एकमेव वारस दाखवून भुमी अभिलेख कार्यालय, राहुरी येथे दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी नोंद करुन सदर मालमत्ता साखरबाई मुरलीधर पटारे हिच्या नावावर केली. त्यानंतर 25 नोव्हेंबर 2021 रोजी सदर जमीन प्रमोद रंभाजी गावडे, रा. डिग्रस ता. राहुरी. याला विकली

या सर्व प्रकरणात डिग्रस गावचे माजी सरपंच पोपट गोपीनाथ बर्डे याने मयत तुकाराम मुक्ताजी पवार यांना साखरबाई मुरलीधर पटारे या एकमेव वारस असल्याचे ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्यानिशी पत्र देवुन सदरची खोटी नोंद लावुन घेण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तसेच साखरबाई मुरलीधर पटारे या तुकाराम मुक्ताजी पवार यांची एकमेव वारस असल्याबाबत तालुका दंडाधिकारी यांचेसमक्ष सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर राजू रावसाहेब भिंगारदे यांनी ओळख म्हणून सही केली आहे. खोटी नोंद लावणेसाठी सरकारी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रात इतर आरोपी साक्षीदार राहिले आहेत.

या प्रकरणी नाना तुकाराम पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश दिलीप पवार, राजू रावसाहेब भिंगारदे, माजी सरपंच पोपट गोपीनाथ बर्डे, गोरख बाळु पवार, बाळु बापू भांड, प्रमोद रंभाजी गावडे, सर्व रा. डिग्रस ता. राहुरी. तसेच साखरबाई मुरलीधर पटारे, रा. तीनवाडी, हरेगाव, ता. श्रीरामपूर. या सात जणांवर गुन्हा रजि. नं. 719/2023 भादंवि कलम 420, 465, 466, 467, 468, 471, 193, 199, 200 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sale of land in the name of deceased, the case against seven persons including a sarpanch

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here