Home पुणे धक्कादायक! विवाहित महिलेची ९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

धक्कादायक! विवाहित महिलेची ९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Pimpari: मानसिक तणावातून विवाहित महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

A married woman committed suicide by jumping from the 9th floor

पिंपरी: पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे मानसिक तणावातून विवाहित महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. सदर आत्महत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मानसिक तणावातून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीमध्ये मयत महिला पती आणि लहान मुलासह राहण्यास आहे. गेल्या तीन महिन्यापासून त्या सह्याद्री सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा पती संगणक अभियंता असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून आज सकाळी पती आणि मुलं घरी असताना इमारतीच्या नवव्या मजल्यावरून थेट उडी घेत महिलेने आत्महत्या केली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A married woman committed suicide by jumping from the 9th floor

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here