Home क्राईम समुपदेशनासाठी गेलेल्या विवाहितेसोबत घडले धक्कादायक कृत्य, परराज्यात नेऊन अत्याचार

समुपदेशनासाठी गेलेल्या विवाहितेसोबत घडले धक्कादायक कृत्य, परराज्यात नेऊन अत्याचार

Nashik: कोरोनामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने समुपदेशकाकडे गेलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून नाशिकसह परराज्यात नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार.

happened to a married woman who went for counseling, being taken to a foreign country Rape

नाशिक:  कोरोनामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने समुपदेशकाकडे गेलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत नंतर लग्नाचे आमिष दाखवून नाशिकसह परराज्यात नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ यादरम्यान घडला आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयित समुपदेशकाला अटक करण्यात आली आहे जोएल जॉन्सन (२६, रा. ऋतु रिजन्सी, एनराईज बाय सयाजी हॉटेलच्या पाठीमागे, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या समुपदेशकाचे नाव आहे. याबाबत पिडीतेने फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार  कोरोना काळात मानसिक स्थैर्याच्या समस्येतून विवाहितेने सोशल मिडीयामार्फत संशयित काउन्सिलरशी संपर्क साधला होता.

संशयिताशी कौन्सिंलिंगच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर संशयिताने प्रेमाचे नाटक करीत पीडितेशी ऋतू रिजन्सी येथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर गुजरात, केरळ व हैदराबाद येथील वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेत बलात्कार केला. तसेच, संशयिताने पीडितेला मारहाणही केली. या प्रकाराची विवाहितेच्या पतीला समजल्याने विवाहितेने पोलीसात तक्रार केली त्यानुसार, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: happened to a married woman who went for counseling, being taken to a foreign country Rape

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here