Home अकोले पाडाळणे गावात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा फडशा

पाडाळणे गावात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा फडशा

Bibatya terror in Padalane village Akole

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील पाडाळणे गावात दत्तवाडी शिवारात बिबट्याने दहशत घातली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडाळणे गावात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सखाराम माधव नवले यांच्या घराशेजारी डोंगरावर दडी धरून बसलेल्या बिबट्याने अंधाराचा फायदा घेत सखाराम माधव नवले यांच्या मालकीच्या दीड वर्षाच्या गायीवर हल्ला चढविला. यावेळी परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. 

सखाराम माधव नवले या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. या बिबट्याच्या हल्ल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून वनविभागाने तातडीने या घटनेचा पंचनामा करून या शेतकऱ्यास  भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. तसेच या परिसरात वाघाची कायमच दहशत असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

Web Title: Bibatya terror in Padalane village Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here