Home संगमनेर सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव

सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव

Tensions in Sangamner after posting offensive posts on social media

संगमनेर | Sangamner: एका धर्मगुरुच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव परिस्थिती निर्माण झाली असून एका समाजाच्या जमावाने शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे संगमनेरात तणावग्रस्त वातावरण निर्मिती झाली आहे.

सोशल मीडियावर एका समाजाच्या धर्मगुरुबाबत वादग्रस्त पोस्ट आल्याने दिल्ली नाका येथे एका समाजाच्या लोकांनी गर्दी केली. त्यानंतर सदर जमाव पोलीस ठाण्यावर आला. ही माहिती तालुक्यात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर तालुक्यातूनही काही लोक पोलीस ठाण्यात आले. तेथे आल्यानंतर जमावाने एकच घोषणाबाजी केली. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी मागणी त्यांनी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे. संगमनेर शहर व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाण्यात हजर झाले.

जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत होता. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर सदर समाजाच्या काही व्यक्तींनी पोलीस प्रशासनास सांगितले की, आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही येथून हटणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु केले. मात्र जमाव पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आहे. जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. संगमनेरातील हा तणाव पाहता आजी माजी नगरसेवक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतांना देखील वातावरण काही शांत होत नाही. आम्हाला आरोपी समोर आणा, अशी मागणी सदर जमावाने केली. शहरात पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Tensions in Sangamner after posting offensive posts on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here