Home संगमनेर संगमनेर: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगमनेर: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Sangamner Accident:  नाशिक-पुणे रोडवरील 132 केव्ही सबस्टेशन समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाल्याची घटना.

Bike rider killed in collision with truck Accident

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे रोडवरील 132 केव्ही सबस्टेशन समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाल्याची घटना घडली. सलीम ईसामुद्दीन पठाण (वय 27) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सलीम पठाण हा तरूण दुचाकीवरुन नाशिककडून संगमनेरच्या दिशेने येत होता. 132 केव्ही सबस्टेशन जवळ आला असता त्याच दरम्यान ट्रक  क्रमांक (आर.जे 14 जीपी 6040) हीच्यावरील चालक याने ट्रक भरधाव वेगात चालवून दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे सलीम पठाण हा तरूण दुचाकीवरुन खाली पडला. आणि त्यास गंभीर मार लागून त्याचा मृत्यू  झाला आहे.

याप्रकरणी जाकीर पिरमहोम्मद शेख (रा.कुरणरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 364/2023 भादवि कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटार वाहक कायदा कलम 184, 134 (अ)(ब), 177, 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आर.एन शेख हे करत आहेत.

Web Title: Bike rider killed in collision with truck Accident

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here