Home संगमनेर संगमनेरात घरफोडी, ५० हजार रुपये,तीन तोळे सोने लंपास

संगमनेरात घरफोडी, ५० हजार रुपये,तीन तोळे सोने लंपास

Sangamner Theft: घोडेकर मळा येथे चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना, घरातील ५० हजार रुपये रोख व तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास.

Burglary in Sangamner, 50 thousand rupees, three tola gold theft

संगमनेर: संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथे चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेत घरातील ५० हजार रुपये रोख व तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घोडेकर मळा येथे अर्जुन काठे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये आणि तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शेजारी राहणारे मोठे बंधू सयाजी काठे यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील समान अस्ताव्यस्त पडलेलेले त्यांना दिसले. लोखंडी कपाट देखील उघडे होते. याबाबत अर्जुन काठे यांचे पुतणे गणेश सयाजी काठे यांनी माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Burglary in Sangamner, 50 thousand rupees, three tola gold theft

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here